Chandrayaan-3 Successful Landing : ऐतिहासिक! चंद्राच्या पृष्ठभागावर 'चांद्रयान-3'चं यशस्वी लँडिंग; मिशन कंट्रोलमध्ये जल्लोष

Chandrayaan-3 Successful Landing : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशासह आवघ्या जागाच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली आहे. भारताने (India) घेतलेली ही एक मोठी झेप आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगने देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ ची लँडिंग

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सतत सावली असते. या भागात सूर्य किरण पोहोतच नाहीत. या भागात Moon Ice आणि पाणी मिळण्याची शक्यता सांगितली जातेय.

या भागात पाणी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीये. या भागात १३ किलोमीटर पर्यंत Crater आहेत. Crater म्हणजे चंद्रावरचे खड्डे. चंद्रावर अनेक प्रकारचे धुमकेतू आदळून हे खड्डे तयार होता. या खड्ड्यांमुळे आकाशगंगेचा इतिहास शोधण्यास मदत होणार आहे. 

यापूर्वी इस्राने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवलं होतं. पण त्यांना यात अपयश आलं. दक्षिण ध्रुवावर तापमान हे उणे २०० डीग्री असतं. या भागात मनुष्याने पाठवलेले मशीन्स खराब होतात. नुकतंच रशियानेही चंद्रावर आपलं यान पाठवलं होतं. पण ते फेल झालं. अशा वेळी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलं होतं. अशातच भारताने आज इतिहास रचला आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply