Ayodhya Ram Mandir : श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने ग्राहकांची फसवणूक, अ‍ॅमेझाॅनला कारणे दाखवा नोटीस

 Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझाॅन या कंपनीच्या वेबसाईटवरून  बेकायदेशीररितीने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या नावाने प्रसाद व मिठाईची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अ‍ॅमेझाॅन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

‘श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने अ‍ॅमेझाॅनवरून अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रसाद असल्याचे सांगत ग्राहकांची फसवणूक केली जात आहे, अशी तक्रार अखिल भारतीय व्यापारी संघाने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्राधिकरणाने अ‍ॅमेझाॅनला फसव्या व्यापार पद्धतींचा अवलंब केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. पुढील ७ दिवसांत अ‍ॅमेझाॅनला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

Shirpur News : तोतया अन्ननिरीक्षकांनी उकळली लाखांची खंडणी; खरे अधिकारी आल्याने समोर आला प्रकार, दोघांना अटक

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची भूमिका

अ‍ॅमेझाॅन या इ काॅमर्स वेबसाईटवरून ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने विविध प्रकारची मिठाई प्रसाद म्हणून विकली जात आहे, याबाबत नोंद घेण्यात आली असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ऑनलाईन खरेदी विक्री वेबसाईटवर उत्पादनाबाबत खोटी माहिती देत ग्राहकांची दिशाभूल केल्यास ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार कारवाई केली जाते.

अ‍ॅमेझाॅनवरुन विकल्या जाणाऱ्या मिठाईचे नाव

१) श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद – रघुपती घी लाडू (टाइप -१, २५० ग्रॅम)

२) अयोध्या राम मंदिर अयोध्या प्रसाद – खोया खोबी लाडू (टाइप – ३, २५० ग्रॅम)

३) श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद – घी बुंदी लाडू (टाइप – ४, २५० ग्रॅम)

४) श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद – देशी गायीच्या दुधाचा पेढा (टाइप – ५, २५० ग्रॅम)

अ‍ॅमेझाॅनची भूमिका काय ?

काही विक्रेत्यांकडून ग्राहकांना चुकीची माहिती देत उत्पादन विकले जात असल्याची माहिती आम्हाला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून मिळाली आहे. प्राधिकरणाकडून संबंधित विक्रेत्यांचा तपास केला जात आहे. आम्ही संबंधित विक्रेत्यांवर आमच्या धोरणांनुसार उचित कारवाई करु, असे अ‍ॅमेझाॅनच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply