Ambernath : पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अंबरनाथमधील युवकाचा दुर्दैवी मृत्यू


Ambernath Rain Accident : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसाने राज्याला झोडपले. उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना पावसाच्या सरीमुळे दिलासा मिळाला. पण पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला. पण याच पावसाचा फटका बसून काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. भरधाव पावसामध्ये अंबरनाथमध्ये दुर्घटना घडली. पावसामध्येच एका तरूणावर काळाने घाला घातला. पावसामध्ये लघुशंका करणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पुण्यात मुसळधार पावसात शॉक लागल्याने अवघ्या १० वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला.

पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अंबरनाथमधील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा परिसरात पाऊस सुरू असताना दुर्दैवी घटना घडली. लघुशंका करायला गेलेल्या तरूणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये विघ्नेश कचरे या १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. मात्र अवकाळी पावसामुळे अंबरनाथमध्ये तरुणाचा नाहक बळी गेला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Pune News : उरुळी कांचनमध्ये कंटेनर-ट्रकचा भयंकर अपघात, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, ५ KM पर्यंत रांगा

प्राथमिक तपासात नाल्यातील विद्युत प्रवाहामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. अवकाळी पावसाने अंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे अशा दुर्घटना घडण्याचा धोका वाढला होता. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, नाल्यात वीज प्रवाह कसा आला याची चौकशी सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा पावसाळ्यातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply