धान्य वितरण प्रणालीत महत्वाचा बदल, जाणून घ्या काय आहे हा बदल….

Alibag : शिधावाटप केंद्रावरील धआन्य वितरण प्रणालीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. नवीन बदल या महिन्यापासून अमलात आणला जाणार आहे. या बदलामुळे धान्य वितरण करतांना लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अधिक सुलभ होणार आहे. तर धान्य वितरण करताना अधिक पारदर्शकता योणार आहे. रेशन धान्य दुकानदारांच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन २०१७ मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत.

बेकायदा बाळगलेले पिस्तूल हाताळताना गोळीबारात एकजण जखमी; सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक भागातील घटना

या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई केव्हायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता आहे.

शिधावाटप केंद्रावर धान्य वितरण करताना डोळ्यांद्वारे लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण करणे शक्य होणार आहे. डोळ्यांची बुबूळ स्कॅन करणाऱ्या नविन ई पॉस मशिन्स रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. धान्यवितरणात सुलभता यावी आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे प्रमाणिक सुलभ व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४२ रास्त भाव धान्य दुकानांत ही नवीन ई-पॉस मशीन्स डोळ्यांच्या बुबूळाच्या स्कॅनरसह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वत्र या नवीन ई पॉस मशिन्स कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. ज्या लाभार्थ्यांचे अंगठ्यांचे प्रमाणिकरण होत नाही त्याचे डोळ्यांमार्फत प्रमाणीकरण केले जाईल. आधार प्रमाणीकरणाची गती देखील वाढणार आहे, लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागणार नाही. – सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड

धान्य वितरण करतांना प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांचे आणि महिलांचे अंगठ्याव्दारे प्रमाणिकरण करण्यात अडचणी येत होत्या. बरेचदा जेष्ठ नागरिकांचे प्रमाणिकरण होत नव्हते. आता डोळ्यांच्या स्कॅनर मुळे त्यात अधिक सूलभता येईल, अडचणी येणार नाहीत. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply