Maharashtra : महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात आले होते, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर काही लोकांना बंदूक दाखवून धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलीप खेडकर फरार झाले आहेत. तर, मनोरमा खेडकर यांना आज अटक करण्यात आली. त्यांची मालमत्ता त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याच्या तक्रारीनंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची चौकशीही सुरू केली आहे.
दिलीप खेडकर यांना २०१८ आणि २०२० मध्ये निलंबनाला सामोरे जावे लागले होते. NDTV द्वारे ऍक्सेस केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की २०१५ मध्ये दिलीप खेडकर यांच्या विरोधात किमान ३०० छोट्या व्यावसायिकांनी तक्रार केली होती आणि त्यांच्यावर अनावश्यक त्रास आणि खंडणीचा आरोप केला होता.
|
२०१८ मध्ये, दिलीप खेडकर कोल्हापूर येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत असताना स्थानिक सॉ मिल आणि लाकूड व्यापारी असोसिएशनने त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली, त्यांनी त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी २५ ते ५० हजार रुपये पर्यंत लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. दिलीप खेडकर हे एकावेळी सहा ते सात महिने परवानगीशिवाय गैरहजर होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१९ च्या तक्रारीत दिलीप खेडकर यांनी एका कंपनीकडून २० लाखांची मागणी केल्याचा आरोप केला होता. २०२० च्या आदेशात म्हटले आहे की दिलीप खेडकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (आचार) नियम, १९७९ च्या नियम ३(१) आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियमांच्या नियम क्रमांक ४ मधील उपकलम १ (अ) अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. आदेशात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारींचा हवाला देण्यात आला आणि चौकशी सुरू करण्यात आल्याचेही म्हटले आहे.
वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल
दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार वाशिम पोलिसांकडून हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू असून, खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले आहेत. खेडकर यांनी छळ झाल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण