Hijab Ban : ब्रेकिंग! मुंबईतील महाविद्यालयात हिजाब बंदी; विद्यार्थ्यांची थेट हायकोर्टात धाव, कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

Hijab Ban : मुंबईतील चेंबुरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एन.जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात हिजाब बंदी करण्यात आली आहे. त्याविरोधात विद्यार्थिनींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतल्याचं समोर आलं आहे. महाविद्यालयाच्या निर्णयाविरोधात नऊ विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. महाविद्यालयाने गणवेशाच्या नावाखाली हा मनमानीपणा असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात १९ जून रोजी सुनावणी होणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, काही महिन्यापूर्वी चेंबूरमधील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात हिजाब , नकाब आणि बुरखा बंदी करण्यात आली होती. या निर्णयाला घेऊन विद्यार्थ्यांनीमुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, कॉलेजच्या चौकटीत झालेला हा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर न्यायमूर्ती एस. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठांसमोर वकील अल्ताफ खान यांनी याचीका सादर केली.

Pune Crime : दारु प्यायला पैसे न दिल्याने डायरेक्ट लोखंडी रॉड डोक्यात टाकला; पुण्यात औंधमध्ये टोळक्याच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

प्रस्ताविकांना नोटीस देण्याचे आदेश याचिकाकर्त्याना दिले आहेत. महाविद्यालय  व्यवस्थापकाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपवर १ मे रोजी एक संदेश पाठवला होता. त्यात ड्रेस कोड म्हणून बुरखा,नकाब टोपी परिधान करण्यास बंदी घालण्याचे नमूद केले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले  होते.

मात्र, आता आजपासून २०२४ आणि २५ शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. या निर्बंधामुळे आपल्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल, याची कुठेतरी भीती विद्यार्थिनींना वाटत आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे. आता १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply