हवामानाचा इशारा : राज्यात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस; मुंबईसह ७ जिल्हे रेड अलर्टवर

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला असून पेरणीची कामेही आता जवळपास आटोपली आहे. अशातच पावसासंदर्भात पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबईसह कोकणकिनारपट्टीला दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. घाटमाथा तसेच पुणे शहर आणि परिसरातही संततधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप होती. विदर्भात नागपूर वगळता अन्यत्र जोरदार पाऊस झाला नाही. मराठवाड्यातही पावसाचा जोर नव्हता. दरम्यान, आता पुढील तीन दिवस मुंबई कोकणासह मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट कायम आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

दुसरीकडे पुण्यातही मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुण्यात हीच पावसाची हीच स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने पुण्याला आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय 10 आणि 11 जुलै रोजी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आलाय. आज सकाळपासून पुण्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. मात्र पुढील तीन ते चार दिवस पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये परिस्थिती अशीच असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी पालघर, ठाण्यासह मुंबईलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

या काळात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुससळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply