मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट होणार; अदानी करणार धारावीचा विकास

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा लवकरच कायापालट होणार आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीने धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचं कंत्राट घेतला आहे. त्यामुळे लवकरच धारावीचा चेहरामोहरा बदलणार आहे. 

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे धारावीच्या विकास करण्यासाठी गौतम अदानी यांची कंपनी पुढे सरसावली आहे. धारावीच्या पुनर्विकास करण्याचं कंत्राट अदानी ग्रुपला मिळालं आहे. हा प्रकल्प ५,०६९ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार कुटुंबांना घरे मिळणार आहे. तर १२०० हून अधिक व्यावसायिक कार्यालयाचा सामावेश आहे.

द हिंदू' या वृत्तपत्राने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एसवीआर श्रीनिवास यांच्या माहिती दिल्यानंतर हे वृत्त समोर आले आहे. या प्रकल्पासाठी अनेक कंपन्यांनी बोली लावली होती. यावेळी सर्वाधिक बोली ही अदानी ग्रुपने लावली. त्यामुळे या प्रकल्पाचं कंत्राट अदानी ग्रुपला मिळालं. या प्रकल्पासाठी डीएलएफ ग्रुपने २,०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

१८ वर्षात चौथ्यांदा पुनर्विकासाचा प्रयत्न

धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न हा १८ वर्षातून चार वेळा करण्यात आला. राज्य सराकर अनेक वर्षांपासून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनर्विकास झाला नाही. आता धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास गौतम अदानी यांची कंपनी यशस्वी होणार का, हे पाहावे लागणार आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply