भारतीय वायुसेनेची सुखोई 30-MkI वरून ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी

भारतीय हवाई दलाने (IAF) पूर्व सागरी किनार्‍यावर सुखोई 30 एमकेआय विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाने सांगितले की, ही चाचणी मंगळवारी पूर्वेकडील सागरी किनार्‍याजवळ भारतीय नौदलाच्या समन्वयाने करण्यात आली.

यादरम्यान सुखोई 30 एमकेआय विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर लाईव्ह फायर करण्यात आले. भारतीय वायुसेनेने ट्विट केले की, मोहिमेदरम्यान, ब्रह्मोस क्षेपणास्त्र थेट त्याच्या लक्ष्यावरील नौदलाच्या जहाजावर आदळले. ही चाचणी यशस्वी झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले.

या चाचणीनंतर भारतीय वायुसेनेला ब्रह्मोस क्षेपणास्त्राने दिवस-रात्र आणि सर्व हवामान परिस्थितीत अचूकतेसह समुद्र किंवा जमिनीवरील कोणत्याही लक्ष्यावर प्रहार करण्याची क्षमता मिळाली आहे. क्षेपणास्त्राची क्षमता आणि Su-30MKI विमानाच्या उच्च कार्यक्षमतेमुळे IAF ला युध्दात जमिनीवर आणि समुद्रावरील युध्दभूमिवर वर्चस्व मिळवता येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply