बद्रिनाथचे प्रवेशद्वार जोशीमठ खचू लागले, कणाकणाने ढासळतोय जोशीमठ; 561 घरांना गेले तडे, लोकांचा जीव टांगणीला!

उत्तराखंडमधील जोशीमठ ढासळण्याच्या परिस्थितीत आहे. येथील 561 घरांमध्ये भेगा पडल्या आहेत. प्रसिद्ध पर्यटन स्थळ जोशीमठ येथे सध्या अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. येथे अनेक ठिकाणी जमीन खचली असून घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंतींमधून पाणी येत असून घरे कोसळण्याची भीती लोकांना वाटत आहे.

जोशीमठ हे भारतातील सर्वात मोठे भूकंपप्रवण क्षेत्र असून ते 5 व्या झोनमध्ये येते. 2011 च्या जनगणना आकडेवारीनुसार या भागात जवळपास 4000 घर होती. यात 17000 लोक राहत होते. पण, आता ही वस्ती वाढली असून त्याचा इथल्या डोंगराळ जमिनीवर थेट मारा होत आहे. त्यामूळे जोशीमठाचे अस्तित्व लवकरच पुसण्याच्या मार्गावर आहे.
या प्रश्नी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आज आज (6 डिसेंबर) उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्या बैठकीतून इथल्या लोकांसाठी तोडगा निघेल अशी आशा या लोकांना आहे. जोशीमठ शहर परिसरात एकूण 561 घरे आहेत. ज्यामध्ये भेगा पडल्या आहेत. सुरक्षेमुळे 2 हॉटेल्स बंद करावी लागली आहेत, तर आतापर्यंत 38 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बाहेर जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा आम्ही मुलांसोबत बाहेर उभे राहतो. कारण भिंत कोसळेल अशी आम्हाला भीती लागून राहिलेली असते. कधी कधी वाटतं हे छतचं कोसळेल की काय, असे तिथले स्थानिक लोक सांगतात.
 
घरांची डागडूजी केली तरी महिन्याभरात पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. त्यामूळे लोक डागडूजीही करत नाहीत. तशाच मोडकळीस आलेल्या घरात राहतात. पण, त्या खचलेल्या भिंतींमधून साप, उंदिर येण्याचा धोका असतो.
समितीच्या अहवालानुसार, जोशीमठ प्राचीन भूस्खलन क्षेत्रात आणि पर्वताच्या तुटलेल्या एका तुकड्यावर, मातीच्या अस्थिर ढिगाऱ्यावर वसलंय. मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये तुटलेल्या ग्लेशियरशी याची टक्कर होऊन हा ढिगारा अस्थिर झाल्याचं गृहीतक मांडण्यात आलंय. पण यालाही कोणताच वैज्ञानिक आधार मिळालेला नाही.

तज्ञांच्या मते, जोशीमठात बांधकाम वाढतंय, लोकसंख्या वाढते आहे. ग्लेशियर आणि सांडपाणी जमिनीत मुरतंय, ज्यामुळे माती वाहून चाललीय. इथं ड्रेनेज सिस्टीम नाहीये ज्यामुळे जोशीमठ जमिनीत धसत चाललाय.

1976 साली आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, "बऱ्याच एजन्सींनी जोशीमठ परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केलीय. तिथले खडक आता जंगलाविना उघडे बोडके पडलेत. जोशीमठ जवळपास 6000 मीटर उंचावर वसलंय. पण इथली जंगलतोड करून झाडांना 8,000 फूट मागे ढकललयं. जंगलतोडीमुळे मातीची धूप आणि भूस्खलन होतंय. पर्वतांची शिखररं झाडांविना उघडी पडली आहेत त्यामुळे तीव्र हवामानाचे पडसाद उमटतायत.

या रिपोर्टमध्ये पुढे असे म्हटलंय की, घरांच्या बांधकामांसाठी जे जड दगड वापरले जात आहेत त्यावर बंदी आणावी. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कामांसाठी खोदकाम किंवा ब्लास्ट करू नये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply