नाशिक : गृह खरेदीला रेडीरेकनर दरवाढीचा चटका

नाशिक : इंधन दरवाढीमुळे बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने घरांच्या किमती पाचशे ते सहाशे रुपये प्रतिचौरस फूट दराने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता १ एप्रिलपासून बाजारमूल्य दरात (रेडीरेकनर) पंधरा ते वीस टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा घरांच्या किमती वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्याबरोबरच रेडीरेकनरचे दर वाढवू नये, अशी मागणी होत आहे.

गेल्या एक ते दीड वर्षात बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील महिन्यात बांधकाम साहित्याच्या वाढत्या दराचा आढावा घेतल्यानंतर बांधकामात चाळीस टक्के वापर होत असलेल्या लोखंडाच्या दरात ११० टक्के, पीव्हीसी पाइप शंभर टक्के, सिमेंट दरात ४४ टक्के, तर ॲल्युमिनिअम व इतर साहित्याच्या दरात ४० ते ७० टक्के दरवाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्या दरवाढीचा फटका व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांना बसणार आहे. दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. साहित्य उत्पादक कंपन्यांनी नफेखोरीचा मार्ग अवलंबिल्याने नुकसान होत असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे. दरवाढी बरोबरच आता जीएसटी आठ टक्क्यापर्यंत, तसेच इंधनाच्या किमती आणखी वाढणार आहे. एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये जिना, लॉबी चार्जेस लावल्याने त्यातून उत्पन्नाचा स्रोत शोधला, मात्र परिणामी घरांच्या किमती वाढणार आहे.

पंधरा ते वीस टक्के दरवाढीची शक्यता

दरवर्षी १ एप्रिलपासून नवीन रेडीरेकनरचे दरवाढ लागू होते. बांधकाम साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता रेडीरेकरनरच्या दरात पंधरा ते वीस टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्तांचे सरकारी दर वाढ होणार असल्याने परिणामी घरांच्या किमती वाढणार आहे.

''बांधकाम साहित्याच्या दरात वाढ होत असल्याने घरांच्या किमती वाढणार आहे. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्यास घरांच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल.''

- रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो.

''सरकारी दरात वाढ झाल्यास घरांच्या किमती अधिक वाढतील. त्याचबरोबर टीडीआर, विकास शुल्काच्या दरवाढीवरही परिणाम होणार आहे.''

- सुनील गवादे, नरेडको



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply