आग्रा येथील जामा मशिदीत उत्खनन करण्याची नवी मागणी; अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुरातत्व खात्याने आग्रा येथील जामा मशिदीत उत्खनन करावे, अशी विनंती करणारी नवी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील वरुण कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मंदिर-मशिद वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

याचिकाकर्ते वकील वरुण कुमार यांच्या म्हणण्यानूसार, आग्रा येथील जामा मशिदीच्या पायऱ्यांच्या खाली ठाकूर केशव देवजी यांच्या मंदिराचे अवशेष मिळण्याची शक्यता आहे. वरुण कुमार यांनी यापूर्वीही याच प्रकराची याचिका मथुरा न्यायालयातही दाखल केली होती. मात्र, अद्याप त्याची सुनावणी झालेली नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेसंदर्भात आग्राच्या जामा मशिदीचे इमामुद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ”ही मशीद शहाजहॉंची मुलगी जॅंहा आरा हिने बांधली होती. तीच्या लग्नाच्या खर्चातून उरलेल्या पैशातून ही मशीद बांधल होती.” तसेच या मशिदीच्या पायऱ्यांखाली अवशेष सापडण्याची शक्यता नाही. अशा परिस्थिती संपूर्ण मशिदीत खोदाकाम करणारे उचित नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मंदिर-मशीद वादवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीत खोदकाम करण्याची तसेच दररोज नवीन वाद सुरू करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply