मुंबई : पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान

मुंबई : मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदीयांना देण्यात आला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रविवारी मुंबईत दाखल झाले.

११ एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पीएम मोदींच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्यांनी आपल्या देशासाठी, तेथील लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी एक अग्रगण्य, तेजस्वी आणि अनुकरणीय योगदान दिले आहे, अशा व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply