भंगारातून गाडी विकत घेतली, डिक्की उघडताच आढळला मृतदेह

नागपूर : कबाड्याने भंगारमध्ये विकत घेतलेल्या एका कारच्या डिकीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गार्डलाईन परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नौशाद नामक भंगार व्यवसायिकाने आठ दिवसांपूर्वी एक जुनी कार विकत घेतली होती. त्याच्या गोदाम परिसरात ती पडून होती. आज ती कापण्यासाठी तो आणि त्याच्याकडे काम करणारे कार जवळ जाताच त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात ३५ वर्ष वयोगटातील मृतदेह आढळला



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *