पुणे हडपसर येथील यश हरणे अंटार्टिकाच्या अभ्यास दौऱ्यावर

पुणे, हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय मांजरीचे माजी प्राचार्य व सध्या नवी दिल्लीच्या नेताजी सुभाष टेकनॉलॉजी विद्यापीठाच्या सिव्हिल विभागाचे प्रोफेसर व डीन डा कैलाश राजारामजी हरणे यांचे चिरंजीव तसेच हडपसर येथील रियल इस्टेट बिझिनेसचे श्री शाम पाटणकर यांचे भाचे, यश हरणे दि १५.०३.२२ पासून ०४.०४.२२ या कालावधीत अंटार्टिक महासागर अभ्यास दौऱ्यावर पॅरिसवरून रवाना झाला आहे. विविध देशातील ९० अभ्यासकाची एक चमू या दौऱ्यात सहभागी आहेत यामध्ये यश सह भारतातील अन्य १ अभ्यासक यामध्ये सहभागी होत आहेत. यश सिंहगड अकॅडेमी ऑफ इंजिनीयरिंग, कोंढवाच्या सिव्हिल इंजिनीयरिंग विद्यार्थी आहे. तो सध्या फ्रान्स मध्ये उच्च शिक्षणाच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तो फ्रान्स वरून ब्राझील मार्गे अर्जेन्टीनाच्या उशुआइया पर्यंत तीन दिवस विमानप्रवास करून दोन दिवस जलमार्गाने दक्षिण ध्रुवावरील अंटार्टिक महासागराच्या बर्फाच्छादित प्रदेशात अभ्यास करण्याकरिता पोहचणार आहे.. प्रगतीच्या या स्पर्धेत प्रगत व प्रगतीशील देश अशी दोन भागात विभागणी झालेली अलीकडच्या काळात दिसून येत आहे. पृथ्वीवरील मानवाचे जीवनमान कसे सुखकर व आरामदायी होईल याकरिता सर्वच देश विविध क्षेत्रात अहोरात्र प्रयत्न व स्पर्धा करीत विविध शोध लावीत आहेत. हे सर्व करीत असतांना मानव शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीतआहे का, याचा वर्तमान व भावी पिढीवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही, याबाबत अभ्यास करणे हा या चमुचा मुख्य उद्देश आहे. आता पर्यंतच्या अभ्यासावरून असे दिसून येत आहे की, पृथ्वीवरील एकूण वापरायोग्य पाण्याच्या फक्त २५ टक्के एवढे पाणी मानवाच्या उपयोगाकरिता सरोवर, नदी, ओढे व भुगर्भातील पाणी आहे व ७५ टक्के पाणी हे ध्रुवीय प्रदेशात गोठलेल्या बर्फाच्या स्वरूपात आहे. मागील अनेक वर्षांपासून कोळसा, लाकूड, खनिज तेल यांच्या अतिवापरामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे यामधून अनेक घातक वायू उदा. कार्बन डाय ऑक्साइड,मिथेन, नायट्रोजन इ. वातावरणात उत्सर्जित होत आहेत व त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात सतत वाढ होत आहे हा आपला सर्वांचा अनुभव आहे. परिणामस्वरूप ध्रुवावरील गोठलेला बर्फ वितळून समुद्रमधील पाण्याची उंची वाढत आहे. जर मानवाने वेळीच यावर नियंत्रण केले नाही तर एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत समुद्रकाठाची अनेक शहरे अर्धेअधिक पाण्याखाली जातील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दक्षिण ध्रुवावर सध्या या गोठलेल्या पाण्याची काय परीस्थिती आहे याची पाहणी करणे. भूतकाळातील बर्फाचे डोंगर, सध्याची परीस्थिती याचा तुलनात्मक अभ्यास व यावरील उपाययोजना हा या चमुच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या अभ्यासदौऱ्याकरिता आर्थिक सहकार्य फ्रान्स येथील ऑडिन्सिया स्कुलने व क्लाईमेट फोर्स एक्सपेडिशनने केलेली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply