पुणे : सीरम कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची ४१ लाखांची फसवणूक

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने हडपसर तसेच सासवड परिसरातील २८ तरुणांची ४१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी मंगेश राजाराम पवार (वय ३२, रा. तुकाई दर्शन, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिकेत जगन्नाथ जगताप (वय २४, रा. ताथेवाडी, सासवड) याने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन महिन्यांपूर्वी जगताप याची आरोपीशी ओळख झाली होती. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष त्याने दाखविले होते. त्याच्याकडून पवारने ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपये घेतले होते. त्याला कंपनीच्या नावाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले होते.

बंगळुरुत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर पुण्यातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये जगताप याच्यासह तरुणांना बोलाविण्यात आले होते. त्यांचा समाजमाध्यमावर समूह तयार करण्यात आला होता. चौकशीत पवारने जगताप याच्यासह आणखी काही जणांकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आले.

Follow us -

दरम्यान, जगतापने सीरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा मंगेश पवार नावाची व्यक्ती कंपनीत अधिकारी नसल्याचे उघडकीस आले. चौकशीत पवार यांनी २८ तरुणांकडून ४१ लाख १५ हजार रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून सहायक पोलीस निरीक्षक विनय झिंजुर्के तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply