
पुणे : विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शुक्रवारी (९ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. गुरुवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता केळकर रस्ता परिसरात मंडळांनी विसर्जन सोहळ्यासाठी तयार केलेले देखाव्यांचे रथ लावले होते. मध्यरात्रीनंतर सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बांबुचे अडथळे उभे करण्यात आले. विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनीवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकासह प्रखर प्रकाशझोत सोडले होते. ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोर तरुणाई नाचत असल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्तामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्च क्षमेतेचे ध्वनिवर्धकांचा वापर केला होता.
ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल ताशा पथकांचा आवाजाने मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे लक्षवेधी ठरले होते.
दणदणाटामुळे पोलीसही हतबल
गेले दोन वर्ष करोना संसर्गामुळे विसर्जन मिरवणूक निघाली नव्हती. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने विसर्जन मार्गावरील बहुतांश मंडळांनी उच्चक्षमेतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती. ढोल ताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले. विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळनंतर झालेल्या गर्दीमुळे विसर्जन मार्गावरुन चालणे देखील अवघड झाले होते.
शहर
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
महाराष्ट्र
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



