
पुणे : वाहतुकीसाठी पर्यायी इंधन स्रोतांचा वापर, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, ओल्या कचऱ्यातून इंधन निर्मिती आणि बांधकाम क्षेत्रात हरित नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी या उपायांच्या मदतीने पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्राला २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाकडे नेणे शक्य असल्याचे पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
तापमान वाढ आणि हवामान बदलांचे संकट सध्या संपूर्ण जगावर टांगत्या तलवारीसारखे आहे. सर्वच प्रदेश त्याचे काही ना काही परिणाम अनुभवतही आहेत. पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्राला शून्य कार्बन उत्सर्जन क्षेत्र बनवण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे एक अहवाल तयार करण्यात आला आहे. २०३० पर्यंत पुणे महानगर प्राधिकरणामध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी २०२० मध्ये पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे एका कार्यक्रम पत्रिकेची आखणी करण्यात आली आहे.
पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्रातील कार्बन उत्सर्जनामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ४४ टक्के वाटा हा वीज क्षेत्राचा आहे. याचे कारण तब्बल ७२ टक्के वीज ही जीवाश्म इंधनापासून तयार होते. पायाभूत सुविधांमुळे तब्बल २५ टक्के कार्बन उत्सर्जन होते. वाहतूक क्षेत्रामुळे सुमारे २४ टक्के, तर कार्बन उत्सर्जनातील कचऱ्याचे योगदान हे सुमारे सात टक्के एवढे आहे. हरित बांधकामाबाबत सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात करण्यात आले असता, पुणे महानगर प्राधिकरण परिसरातील सुमारे ४५ टक्के कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य असल्याचे पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्रात सुमारे ५२ लाख वाहने रोज रस्त्यावर धावतात. ही वाहने सुमारे १.२ दशलक्ष टन डिझेल, ०.५६ दशलक्ष टन पेट्रोल, तर ४७ हजार किलो सीएनजीवर चालतात. त्यातून ५.८ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन होते. वीज आणि पर्यायी ऊर्जेवर चालणारी वाहने सुमारे ४० टक्के पर्यंत रस्त्यावर धावल्यास २०३० पर्यंत वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन सुमारे ३० टक्केपर्यंत कमी करणे शक्य असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. पुणे महानगर प्राधिकरणात दररोज निर्माण होणारा सुमारे ५०८५ टन कचरा हा सात टक्के कार्बन उत्सर्जनास कारणीभूत ठरतो. कचऱ्याचे वर्गीकरण आणि नियमित विल्हेवाट, ओल्या कचऱ्याचे रूपांतर बायोगॅसमध्ये करणे अशा प्रयत्नांतून कचऱ्यातून होणारे कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत ९० टक्के कमी करणे शक्य असल्याचे पीआयसीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


