
पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नाल्यात ढकलून देण्यात आल्याची घटना कर्वे रस्त्यावर मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
कोथरुडमधील मृत्युंजयेश्वर मंदिर परिसरातील एका सोसायटीत ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ते सोसायटीच्या परिसरातून जात होते. कर्वे रस्त्यावरील मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ त्यांना चोरट्यांनी गाठले. धक्काबुक्की करुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना नाल्यात ढकलले. नाल्याला कठडा नसल्याने ते सात फूट उंचीवरुन नाल्यात पडले. या घटनेत त्यांना फ्रॅक्चर झाले. या भागातील एका सोसायटीतील रहिवासी नागेशकुमार नलावडे तसेच कर्वे रस्त्यावर टेम्पो चालकांच्या लक्षात लुटमारीचा प्रकार आला. नलावडे यांनी त्वरीत या घटनेची माहिती कोथरुड पोलीस तसेच अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्ट्रेचरचा वापर करुन त्यांना नाल्यातून बाहेर काढले. नलावडे आणि टेम्पो चालकांनी आरडाओरडा केला. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत चोरटे नाल्यातून पसार झाले होते.
शहर
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती























Subscribe to my channel


