Vashi Bridge : वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट! मुंबईला जोडणारा Vashi Bridge लवकरच होणार खुला

Vashi Bridge : वाहनधारकांना नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य रस्ते विकासमंडळ नवं गिफ्ट देणार आहे. मुंबईला जोडणारा ठाणे खाडी पुलाचं काम पूर्णत्वावर आलाय. या पुलाला वाशीचा पूल (Vashi Bridge) देखील म्हणूनही ओळखलं जातं. हा पूल नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची शक्यता आहे. विशेष दोन महिन्यापूर्वीच म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचा नवी मुंबईला जाणारा भाग वाहनधारकांसाठी खुला झाला होता. त्यानंतर ही नवीन बाब समोर आलीय.

वाशी पुलावरील रहदारी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. वाशी पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून या पुलावरून दर दिवसाला वाशी ते मुंबई दरम्यान साधारण ६४,३०० वाहनांची ये-जा होते. त्यामुळेच हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या पुलाला मुंबईला जोडणारा चौथा क्रिक ब्रिज म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नवीन पूल बांधला असून तो खाडीवर पसरलेला आहे.

अधिक रहदारीचा मार्ग कमी करण्यासाठी हा पूल राज्याचा दीर्घकालीन योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

बॉलिवूड चित्रपटात दाखवला जातो पहिला पूल

खाडीवर दोन पूल आधीपासून आहेत. हा पूल 1973 मध्ये बांधण्यात आला असून यात दोन लेन आहेत. जी सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन दशकांपासून हा पूल नियमित रहदारीसाठी बंद आहे. मात्र हा पूल कधीकधी बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुंबईच्या पार्श्वभूमीचा भाग म्हणून दाखवला जातो. तर दुसरा पूल 1997 मध्ये बांधण्यात आला असून हा सहा पदरी पूल आहे.

मुंबईकडे येण्यासाठी तीन मार्ग आणि वाशीकडे जाण्यासाठी तीन मार्ग या पुलावर आहेत.दरम्यान मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढलीय. मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान वाहतूक देखील वाढली, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. सायन-पनवेल महामार्ग 10 लेनमधील विस्तारामुळे ही समस्या आणखी वाढलीय.

वाहतुकीची ही समस्या लक्षात घेत एमएसआरडीसीने दोन पूलाच्या बांधकामाचा 559 कोटी रुपयांचा प्रकल्प लार्सन अँड टुब्रोला दिला. दोन्ही पूलांची लांबी 3.14 किलोमीटर असून याची संरचना 1997 सालची आहे. नव्याने उघडलेल्या नवी मुंबईला जाणाऱ्या पुलामुळे आधीच वाहतुकीचा प्रवाह सुधारलाय. मुंबईला जाणाऱ्या पुलामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply