Local Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या वर्षी केंद्राकडून 300 नव्या लोकलचं गिफ्ट आणि बरंच काही...

Mumbai : केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिलं आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स सुरु केल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली असून यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार मानलं आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करुन एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यात भाजपानं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपानं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकाच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईकरांसाठी 300 नवीन लोकल ट्रेन्स उपलब्ध होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं 3 मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे.

Crime News : डॉक्टरनेच केली २१ वर्षीय महिला पेशंटची छेडछाड; घटनेच्या निषेधार्थ परळी बंदची हाक

पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची, तसेच मध्य रेल्वेवरच्या परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकांवर नवी टर्मिनल्स उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या परियोजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासोबतच एमएमआर रिजनमध्ये कनेक्टिव्हिटी, व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांसाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं 27 नोव्हेंबरपासून मुंबईत 13 अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ही आता 96 वरुन 109 वर पोहोचली आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply