Author: admin
राघव चंद्रा यांचा कॉलम:घाईगडबडीतील पायाभूत सुविधांचे काम काय कामाचे, ते टिकतच नाही?
देशात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तारझाला आहे, हे सत्य आहे. पण प्रकल्प पूर्ण झाल्यावरकाही दिवसांतच त्यात सातत्याने त्रुटी समोर येणे हीचिंतेची बाब आहे. मोठ्या बजेटमधून तयारव नुकत्याचसुरू झालेल्या लखनऊ-कानपूर एक्सप्रेस-वे आणि गंगाएक्सप्रेस-वेमध्ये रस्ता निसरडा होणे, भेगा पडणे, जमीनखचणे तसेच खड्डे पडण्याच्या अनेक घटना समोरआल्या . याआधी दिल्ली-डेहराडून आणि दिल्ली-मुंबईएक्सप्रेस-वेवरही असेच घडले होते. या घटनांतकोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पणयापेक्षा जनता व सरकार यांच्यातील विश्वास कमी होणेही जास्त मोठी हानी आहे. 3 मे 2026 च्या रात्री भागलपूरजवळ विक्रमशिला पुलाचा33 मीटर लांब स्लॅब तुटून खाली पडला. 4.7 किलोमीटरलांब पुलाचे दोन तुकडे झाल्यामुळे दक्षिण व उत्तरबिहारचा रस्ते-संपर्क तुटला. लष्कर आणि बीआरओनेमिळून बेली ब्रिज तयार केला नव्हता तोपर्यंत प्रवाशांना161 किलोमीटर लांब पर्यायी मार्गाने जावे लागले . नंतरनौकांचा आधार घ्यावा लागला. 2022 ते 2024 दरम्यानअगुवानी ते सुलतानगंज दरम्यान बनणारा पूलही तीन वेळाकोसळला. मे 2025 मध्ये केरळमध्ये एनएच-66 च्यारामानाट्टुकरा-वलंचेरी टप्प्याचे काम पूर्ण होणारच होते.तितक्यात एक रीइन्फोर्स्ड अर्थ वॉल कोसळली. ऑगस्ट2025 मध्ये हिमाचल प्रदेश व पंजाब दरम्यान चक्की ब्रिजकॉरिडोअरवर काही महिन्यांपूर्वीच बनलेली 100 मीटरलांब प्रोटेक्शन वॉल तुटली. नुकतेच मध्य रेल्वेच्याभोरघाट भागात ठाकूरवाडी व मंकी हिल दरम्यानच्याभूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. 50-60 मीटर रेल्वेलाईन वाहून गेली. 30 गाड्या रद्द झाल्या. या वेगवेगळ्याठिकाणी दुर्दैवाने झालेल्या एकाकी घटना नाहीत.भू-तांत्रिक तपासाची कमतरता, जमिनीच्यामजबुतीकरणाकडे दुर्लक्ष, पाण्याचा निचरा होण्याची पुरेशीव्यवस्था न करणे व जिथे योग्य नाही अशा भागातरीइन्फोर्स्ड-सॉईल वॉल तंत्रज्ञानाचा वापर करणे— त्यांनाया घटनांचे कारण मानले जाऊ शकते. आणखी एक मोठेकारण म्हणजे डिझायनर, कंपन्या, स्वतंत्र अभियंता आणिएनएचएआयचे प्रत्यक्ष क्षेत्रातील कर्मचारी यांच्यातीलदेखरेखीची रचना इतकी विखुरलेली आहे की, काहीचुकीचे घडल्यास कोणाचीही जबाबदारी निश्चित करतायेत नाही. भिंतीचा, रस्त्याचा किंवा पुलाचा भागकोसळायलाच नको होता. त्यावर खर्च झाला. वास्तविकप्रत्येक रुपया हा नवीन पायाभूत सुविधा निर्माणकरण्यासाठी किंवा सध्याच्या रचनेच्या दुरुस्तीसाठीवापरता आला असता. यात अप्रत्यक्ष खर्चही खूप जोडलाजातो. यात उत्पादकता घटते आणि कामांसाठी पूलबांधले होते. सरकारी टेंडर सर्वात कमी बोली लावणाऱ्याकंत्राटदाराला दिले जात असल्यामुळे गुणवत्तेवर परिणामहोतो. कंत्राटदार खूप कमी बोली लावून प्रकल्पमिळवतात. त्यांच्याकडे नफा मिळवण्याचा एकच मार्गउरतो—साहित्य, जमिनीची तपासणी व बांधकामातकपात करणे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)आणि जमिनीचे मूल्यांकन हे प्रत्येक प्रकल्पाचा पाठीचाकणा असतात. पण अनेकदा हे अहवाल जुन्याप्रकल्पांच्या अहवालांवरूनच बनवले जातात. काँक्रीटओतण्यापूर्वी या कमतरता शोधण्याचे काम स्वतंत्रअभियंत्यांचे असते. रीइन्फोर्स्ड वॉल आणि पुलांच्याडिझाइनची योग्य तपासणी व्हायला हवी. ही तपासणीकेवळ सामान्य डीपीआरच्या अंदाजांवर आधारित नसावीतर मातीची पक्की चाचणी व किमान एका दशकातीलमान्सून तसेच पुराच्या आकड्यांवर आधारित असावी.आपण पायाभूत सुविधांच्या विकासाच्या वेगाचा अभिमानबाळगणे आणि त्याचे गोडवे गाणे बंद केले पाहिजे. आपणप्रमाणापेक्षा गुणवत्तेला, दिखाव्यापेक्षा टिकाऊपणालाआणि घाईगडबडीपेक्षा प्रभावीपणाला जास्त महत्त्व दिलेपाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
Continue Reading
