अमिताभ कांत यांचा कॉलम:देशाला परीक्षांसाठी आता एका ‎नव्या व्यवस्थेची नितांत गरज‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर‎ अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा‎ व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.‎त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरज‎आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजी‎नीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काही‎दिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिली‎होती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काही‎वेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचा‎फटका नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बसतो.‎ आजही भारत जगातील सर्वात मोठ्या आणि‎महत्त्वाच्या परीक्षा अशा व्यवस्थेद्वारे घेण्याचा प्रयत्न‎करत आहे. ती सध्याचे प्रमाण, गुंतागुंत व आव्हानांनुसार ‎‎अद्ययावत झालेली नाही. ही समस्या केवळ तात्पुरत्या ‎‎देखरेखीच्या उपायांनी सुटणारी नाही. भारतामध्ये‎एवढ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याबाबतीत जगात‎दुसरे उदाहरण नाही. 2018 ते 2023 या काळात एनटीएने ‎‎244 परीक्षा घेतल्या. या कालावधीत उमेदवारांची‎संख्या सुमारे 67 लाखांवरून 1.22 कोटींवर पोहोचली. ‎‎केवळ नीट परीक्षेतच एका वेळी 22 ते 24 लाख‎विद्यार्थी सहभागी होतात. 2024 मध्ये चीनच्या‎गाओकाओ परीक्षेसाठी 1.34 कोटी नोंदणीकृत‎उमेदवार होते, तर दक्षिण कोरियाच्या सीएसएटी‎परीक्षेसाठी 2026 मध्ये सुमारे 5.54 लाख अर्जदार होते.‎भारतातील नीट परीक्षा गाओकाओपेक्षा लहान असली,‎तरी कोरियाच्या एकमेव राष्ट्रीय परीक्षेपेक्षा खूप मोठी‎आहे. शिवाय चीन किंवा कोरियाप्रमाणे भारतात दरवर्षी‎फक्त एकच केंद्रीय परीक्षा घेतली जात नाही. आपली‎परीक्षा व्यवस्था सातत्याने चालणारी, संघराज्यीय,‎बहुभाषिक आणि व्यापक स्वरूपाची आहे.‎ म्हणूनच चीन किंवा कोरियाचे मॉडेल भारतात तंतोतंत‎लागू होऊ शकत नाही. तेथे संपूर्ण सरकारी यंत्रणा एका‎निर्णायक परीक्षेभोवती उभी राहू शकते; भारतात मात्र‎वर्षातून अनेकदा संपूर्ण व्यवस्था परीक्षा सुरक्षेसाठी‎वळवणे शक्य नाही. भारतीय परिस्थितीनुसार मजबूत,‎विभागीय पातळीवर कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि‎मानकांमध्ये केंद्रीकृत अशी नवी प्रणाली आवश्यक‎आहे. 2024 मधील वादांनंतर डॉ. के. राधाकृष्णन‎यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीय‎समितीने हाच मुद्दा अधोरेखित केला. एनटीएमार्फत‎परीक्षा अधिक पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे‎घेण्यासाठी व्यापक सुधारणांचा आराखडा समितीने‎सुचवला. संदेश स्पष्ट होता—देशाला परीक्षांसाठी‎नव्या व्यवस्थेची गरज आहे. पहिली सुधारणा‎संस्थात्मक पातळीवर व्हायला हवी. तंत्रज्ञान कमकुवत‎संस्थेची भरपाई करू शकत नाही; ते जास्तीत जास्त‎तिच्या उणिवांना डिजिटल स्वरूप देऊ शकते.‎एनटीएला सायकोमेट्रिक्स, सायबर सुरक्षा,‎लॉजिस्टिक्स, डेटा विश्लेषण, प्रश्नपत्रिका निर्मिती,‎विक्रेता व्यवस्थापन आणि कायदा अंमलबजावणी‎यांसारख्या क्षेत्रांत मजबूत अंतर्गत क्षमता असलेली‎कायमस्वरूपी, व्यावसायिक आणि ध्येयाधारित‎मूल्यांकन संस्था बनवणे आवश्यक आहे. खासगी‎पुरवठादार, तात्पुरते निरीक्षक आणि बाह्य यंत्रणांवर‎मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली मर्यादित क्षमता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असलेली संस्था देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांचा‎भार पेलू शकत नाही. दुसरी सुधारणा प्रश्नपत्रिका तयार‎करण्याच्या प्रक्रियेत व्हायला हवी. कोणत्याही व्यक्तीने‎पूर्णपणे पाहिलेली नसते. तीच सर्वात सुरक्षित‎प्रश्नपत्रिका असते. याच कारणामुळे यूपीएससी आणि‎जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षांमध्ये मोठी व गोपनीय तज्ज्ञ‎मंडळे, टप्प्याटप्प्याने विभागलेली प्रक्रिया, अनेक‎समांतर प्रश्नसंच, खासगी मध्यस्थांना अत्यल्प प्रवेश‎यांसारख्या उपाययोजना प्रभावी ठरतात. त्यामुळे एखादी‎कडी तुटली तरी संपूर्ण परीक्षा धोक्यात येत नाही. तिसरी‎सुधारणा तांत्रिक असावी.राधाकृष्णन समितीने‎सुचविल्याप्रमाणे 1 हजार केंद्रीय विद्यालये व इतर‎विश्वासार्ह सार्वजनिक संस्थांना सुरक्षित परीक्षा केंद्रे‎म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव अमलात आणला‎पाहिजे. ओळख पडताळणी आणि देखरेख यंत्रणाही‎अधिक मजबूत करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा‎वापर न्यायवैज्ञानिक तपासासाठीही केला जाऊ शकतो.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य एका‎सकाळी होणाऱ्या एका परीक्षेवर‎अवलंबून असू शकत नाही. बहुपदरी‎परीक्षा, अधिक संधी, प्रमाणित गुणांकन‎व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था‎आवश्यक आहे. एका प्रश्नपत्रिकेचे‎काळ्या बाजारातील मूल्य कमी करून‎संपूर्ण परीक्षा व्यवस्था अधिक सक्षम‎बनवू शकतो.‎


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:दैनंदिन व्यायामाला पर्याय म्हणून कोणता खेळ निवडाल?


This post was originally published on this site.


Continue Reading

गिरगावकर तहानलेले! मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण.



Continue Reading
Miracle at Junnar: Doctors Bring 2.5-Year-Old Girl Back from the Jaws of Death After Cobra Bite.

मृत्यूवर मात! अडीच वर्षांच्या चिमुकलीला नागाचा दंश; हृदय बंद पडले असताना डॉक्टरांनी परत आणले मृत्यूच्या दाढेतून!



Continue Reading
Massive Fire at Lucknow Coaching Centre: Students Jump From Windows to Save Lives as 14 Fire Tenders Rush to the Spot.

लखनौत कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडक्यांतून मारल्या उड्या, अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल!



Continue Reading
West Bengal's First BJP Budget Unveiled: 20% DA Hike, 1 Lakh Government Jobs, and Major Welfare Schemes for Women.

पश्चिम बंगालचा पहिला भाजपा अर्थसंकल्प सादर: सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये २० टक्क्यांची वाढ, १ लाख नोकऱ्या आणि महिलांसाठी विशेष योजनांचा वर्षाव!



Continue Reading
Relief for Commuters: Settle Pending Traffic Challans via National Lok Adalat in 2026.

वाहनधारकांसाठी दिलासा! २०२६ मधील 'राष्ट्रीय लोक अदालती'द्वारे थकीत ट्रॅफिक चलनांचा निपटारा करण्याची सुवर्णसंधी.



Continue Reading
NEET Re-Exam Smooth Under Security, But BEST Strike Costs Late Students Their Academic Year.

नीट परीक्षा सुरळीत पण, 'बेस्ट' संपामुळे काहींचे एक ते तीन मिनिटांच्या विलंबामुळे गेले वर्ष वाया!



Continue Reading