Vallabh Benke Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, पंचक्रोशीवर शोककळा

Vallabh Benke Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालं आहे. जुन्नरचे वल्लभ बेनके हे आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रविवारी वल्लभ बेनके यांची प्राणज्योत मालवली. वल्लभ बेनके यांच्या निधनाने जुन्नर परिसरात शोककळा पसरली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांची निधनाने कार्यकर्त्यांच्या शोककळा पसरली आहे. स्पष्ट वक्तेपणा,धडाकेबाज नेता अशी वल्लभ बेनके यांची ओळख होती. शरद पवारांचे सहकारी म्हणूनही वल्लभ बेनकेंनी काम केलं.

https://puPune Crime News : पुणे पुन्हा हादरलं! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घराला कुलूप लावून गेला पळून

आमदार,कृष्णा खोरे महामंडळ अशा विविध पदावर बेनकेंनी काम केलं. एक महिन्यापूर्वी शरद पवार यांनी जुन्नर दौऱ्यावर असताना वल्लभ बेनकेंची भेट घेतली होती.

वल्लभ बेनकेंचा जन्म २३ जून १९५० रोजी हिवरे बुद्रूक या छोट्याशा गावात झाला. त्यांचा शेती प्रमुख व्यवसाय होता. कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी बेनके यांची ओळख आहे. बेनके हे शरद पवारांच्या विश्वासातील नेते होते. प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. आजारपणामुळे मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते.

धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी ते विविध आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता. या धरणग्रस्तांच्या आंदोलनातूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाकामासाठी अनेक प्रकल्प दरबारातून मंजूर करून घेतले होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील देवस्थानांचा विकास करण्यासाठीही निधी मिळवून दिला होता. त्यांनी नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply