Revanth Reddy : रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्र्यांसह इतर १२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Revanth Reddy : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची आणि भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तसेच इतर 11 आमदारांनी देखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली.

दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी भव्य एलबी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

China Virus : शेवटी 'ती' भीती खरी ठरली! चीनमधील रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री; दिल्लीत आढळले ७ रुग्ण

रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे पहिले काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि 2014 मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आहेत.

रेवंथ रेड्डी यांच्या सोबत शपथ घेतलेल्या आमदारांची यादी

  1. भट्टी विक्रमार्क मल्लू - उपमुख्यमंत्री
  2. नालामाडा उत्तम कुमार रेड्डी
  3. सी दामोदर राजनरसिम्हा
  4. कोमटिरेड्डी वेंकट रेड्डी
  5. दुद्दिला श्रीधर बाबू
  6. पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी
  7. पूनम प्रभाकर
  8. कोंडा सुरेखा
  9. डी. अनसूया सीताक्का
  10. तुम्मला नागेश्वर राव
  11. जुपल्ली कृष्ण राव
  12. गद्दाम प्रसाद कुमार

 या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 119 जागांपैकी 64 जागा मिळाल्या होत्या. यासह तेलंगणात काँग्रेसने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) सुमारे दहा वर्षांची राजवट संपुष्टात आली. निवडणुकीतील पराभवानंतर के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply