Pune Rain News : पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर गुरुवारी (ता. २७) रेड अलर्ट, उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहर आणि जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली होती. सकाळी साडेआठ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार, भोर येथे सर्वाधिक १४६ मिलिमीटर तर शिरूर येथे सर्वांत कमी एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

चिंचवड येथे ८.५ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात गुरुवारी कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, मंडला, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्‍चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा दरवाजा आज उघडणार; नदीकाठच्या गावांना इशारा

रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत गुरुवारी अति जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply