Pune : भंगाराच्या गॅरेजमध्ये भीषण स्फोट; एकाच दुर्दैवी मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Pune : भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना पुण्याच्या बी.टी. कवडे रोड येथे घडली आहे. या घटनेत एकाच मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. महबूब शेख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भंगाराच्या दुकानामध्ये भीषणस्फोट झाल्याने एक इसम जागीच ठार झाला. तर तीन जर गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या स्फोटाचा आवाज अर्धा किलोमीटर लांबपर्यंत ऐकू आला. त्यामुळे काहीकाळ परिसरात भितीचं वातावरण होतं. नेमकं काय झालं आणि आवाज कसला झाला हे नागरिकांना समजलं नाही. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

Chandrapur Forest Aria : चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र झाले कमी; नव्या सर्वेक्षणात समोर आले वास्तव

बी टी कवडे रोडवर पेट्रोलपंपा जवळ एक भंगाराचं दुकान आहे. या दुकानात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की अर्धा किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे नागरिकमध्ये भिंतीच वातावरण निर्माण झालं. या या घटनेत एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहे. जखमींना उपचार कामी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.

बी. टी. कवडे रस्त्यावर नवशा गणपती पुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पञ्याचे शेडमध्ये फ्रिजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचे उघड झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात बाजूला काही रिक्षा लावलेल्या होत्या त्या रिक्षांचेही नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply