Pune Crime : पुण्यामध्ये काय चालललेय? दिवसाढवळ्या व्यावसायिकावर गोळीबार, गंगाधाम परिसर हादरला!

Pune : पुण्यामध्ये गणेश विसजर्नाच्या पूर्वसंध्येला गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यामध्ये दिवसाढवळा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुणे पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. पुण्यातील गंगाधाम परिसरात गोळीबाराची ही घटना घडली. गोळीबारात वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. २ ते ३ अज्ञात तरुणांनी वाळू व्याव्यसायिकावर गोळीबार केला. या हल्ल्यात २ राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ganpati Visarjan 2024 : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ठाणे पोलीस सज्ज! ९ हजार पोलिसांचा २२ तास असणार वॉच

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. भरचौकात आणि दिवसाढवळ्या हा गोळीबार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply