PM Modi Pune Visit : मोदींनी दाखवला पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना हिरवा झेंडा; पुणेकरांना प्रवास सुसह्य होणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचं उद्घाटनं मंगळवारी पार पडलं. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळं पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार आहे. 

विस्तारित मार्गांचं वैशिष्ट्य काय?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉल तसेच फुगेवाडी ते शिवाजी नगर सिव्हील कोर्ट या दोन विस्तारित मार्गाचं उद्घाटन झालं. यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाच आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचं उद्घाटनं वर्षभरापूर्वी मोदींच्याच हस्ते झालं होतं. यामध्ये वनाज ते सिव्हिल कोर्ट हा ८ किमीचा मार्ग आहे. या मार्गावरचा २२ मिनिटांचा प्रवास असेल. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा २५ किमी चा प्रवास आहे.

PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराच्या स्वरूपात ‘केसरी’चा पहिला अंक, पुणेरी पगडी व टिळकांसारखं उपरणं,

मेट्रोसाठी किती असणार तिकीट?

  1. वनाज ते रुबी हॉल - २५ रुपये

  2. वनाझ ते पुणे महापालिका - २०

  3. रुबी हॉल ते पिंपरी - ३०

  4. रुबी हॉल ते शिवाजी नगर - १५

  5. पिंपरी ते सिव्हील कोर्ट - ३०

  6. वनाज ते रेल्वे स्टेशन - २५

  7. रुबी हॉल ते डेक्कन - २५



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply