
NEET Exam : देशभरात सध्या नीट परीक्षेतील गैरप्रकारावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा, महत्वाचा निर्णय घेता आहे. नीट ( NEET) परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहाराचा तपास CBI कडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET (UG) परीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत काही अनियमिततेची प्रकरणे समोर आली आहेत. यावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले. याच मुद्यावरून विरोधकांनीही सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले होते. दरम्यान परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी, सरकारने पुनरावलोकनानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपर फुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 लागू केला आहे. पेपर फुटी प्रकरणामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सामील असल्याचे आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी १ कोटींपर्यंतच दंड तसेच १० वर्षांच्या कारावासाची शिक्षादेखील होऊ शकते.
|
|
पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेतील गोंधळ आणि पेपर फुटल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने शनिवारी दिले. की NEET परीक्षेच्या संदर्भात कथित अनियमिततेची काही प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी, शिक्षण मंत्रालयाने पुनरावलोकनानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनात नमूद करण्यात आले.
5 मे रोजी NEET-UG ची परीक्षा देशातील 4,750 केंद्रांवर घेण्यात आली आणि सुमारे 24 लाख उमेदवारांनी त्यात भाग घेतला. या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. मात्र निकालानंतर लगेचच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला, कारण 67 हून अधिक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवले, त्यापैकी काही विद्यार्थी हे एकाच परीक्षा केंद्रातील होते. प्रारंभिक पोलिस तपासात बिहारमध्ये हा प्रकार घडल्याचे आणि पेपर फुटल्याचे उघड झाले. तसेच काही उमेदवार पुढेदेखील आले आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीच आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या असा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
UGC NET परीक्षेच्या कथित पेपर लीकची देखील CBI चौकशी करत आहे. ही परीक्षा यावर्षी 18 जून रोजी घेण्यात आली होती आणि दोन दिवसांनंतरच 20 जून रोजी रद्द करण्यात आली होतीती. या प्रकरणी सीबीआयने 20 जून रोजी एफआयआर नोंदवला होता.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET-PG प्रवेश परीक्षेसह CSIR-NET परीक्षाही स्थगित केली. या मुद्यावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू असून एनटीए महासंचालक (डीजी) सुबोध सिंग यांना शनिवारी पदावरून हटवण्यात आले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

