Nashik Accident : नातीला शाळेत सोडण्यासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात आजोबा अन् नातीचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंगसे गावा जवळ एसटी बस आणि दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुचाकीवरून आजोबा दोन शाळकरी विद्यार्थिनींना शाळेत सोडण्यासाठी जात होते. अपघातात दुचाकी थेट एसटीबसच्या चाकाखाली आली. त्यामध्ये आजोबा आणि एक शाळकरी विद्यार्थिनी चिरडली गेली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय. तर एक विद्यार्थिनी यामधून बचावली असून ती गंभीर जखमी आहे.

Pune Crime : धक्कादायक! तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

सिताराम सूर्यंवंशी हे सकाळच्या सुमारास आपल्या दोन नातींना घेऊन शाळेत परिक्षेच्या पेपरसाठी सोडवायला दुचाकीवरुन जात होते. यावेळी नाशिककडून मालेगावकडे जाणा-या बसची धडक बसल्याने दुचाकी बसच्या खाली गेली. यात आजोबा सिताराम सूर्यवंशी आणि एका नातीचा मृत्यू झाला तर दुसरी नात गंभीर जखमी झाली. अपघाताचे वृत्त कळताच मुंगसे गावातील नागरीकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोके आंदोलन केले असून वारंवार अपघात होत असल्याने गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने प्रांतअधिकारी,पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

आजोबांसह नातीचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेनंतर मुंगसे ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला आहे. शाळेत जाताना वाटेतच काळ अशा पध्दतीने घाला घालेल अशी पुसटशीही कल्पना या विद्यार्थिनींच्या मनात आली नसेल. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply