Mumbai-Pune Express Way Landslide : मुंबई पुणे एक्सप्रेसवरील दरड हटवण्याचे काम सुरू; वाहतूक धीम्या गतीने

Pune Landslide : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र दरड कोससळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. आता तीनपैकी दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. एक लेन अजुनही बंद आहे. 

सदरचा मातीचा मलबा बाजुला करून मध्यरात्री आडीच वाजण्याच्या सुमारास दोन लेन वरून वाहतुक सुरु करण्यात आली आहे. तिसऱ्या आणि शोल्डर लेनवर दरडीचा मलबा बाजूला काढून ठेवण्यात आला आहे. या दरड दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र वाहतुक वाहतुक संथ गतीने सुरु आहे. 

Pune Crime News : पत्नी आणि पुतण्याची हत्या करत सहाय्यक पोलीस आयुक्ताने संपवलं जीवन; पुण्यातील खळबळजनक घटना

एक लेन बंद असल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरील लगदा रात्री अडीच वाजेपर्यंत हटविण्यात आली होता. त्यामुळे दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply