Mumbai Dam Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला, वाचा आजची ताजी आकडेवारी

 Mumbai Dam Water Level : मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाणीसाठी वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.

मुंबईत सोमवारी ७१ हजार १४७ दशलक्ष लिटर पाणीसाठा नोंदवण्यात आला. म्हणजेच एकूण २०.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

Rain Update : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार... मुंबई-कोकणासाठी धोक्याची घंटा! रेल्वेसेवा विस्कळीत, महामार्ग बंद

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही दऱणात पाणीसाठा वाढला आहे. या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यातून रोज ३ हजार दशलक्ष पाणीपुरववठा केला जातो. यामुळेच महापालिकेने मागील काही दिवस १० टक्के पाणीकपात केली होती. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला होता. मात्र, मागील दोन दिवसात धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात हा पाणीसाठी २२ टक्के होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा कमी आहे.

मागील २४ तासात विहार धरणक्षेत्रात ३६४ मिमी आणि तुळशी धरणक्षेत्रात २५४ मिमी पाऊस पडला. मुंबईतील पवई तलावदेखील काल ओव्हरफ्लो झाला. या धरणातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरला जातो.

मुंबईतील सात धरणांमधील पाणीसाठा

मोडक सागर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा आहे. तर तानसा धरणात ४०.६१ टक्के पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा धरणात १९.५१ टक्के पाणीसाठा तर भातसा धरणात १६.१३ टक्के पाणीसाठा वाढला. विहार धरणात ३१.७४ टक्के पाणीसाठा तर तुळशी धरणात ४५.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली असल्याचे सांगितले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मागील तीन दिवसात पाणीसाठ्यात जवळपास १० टक्के वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात २०.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply