Maharashtra Politics : नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची नोटीस

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपसून सुरू झाले आहे. यादरम्यान राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर नेते, आमदारांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येत आहे

याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झालेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे व विप्लव बाजोरीया यांच्याविरोधीतअपात्रतेसाठी ठाकरे गटाकडून पत्र देण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Session : उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमदारांना व्हीप बजावण्याची शक्यता

नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विपल्व बजोरिया यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपत्रतेसाठी नोटीस बजावली असून आहे. या तीनही विधानपरिषदेच्या आमदारांनी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडून या तिघांविरोधात विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे. लवकरत लवकर या संदर्भातील निर्णय घेण्यात यावा अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply