Lebanon Attack on Israel : हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्रायलवर हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी

Lebanon Attack on Israel : एकीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना, या युद्धात आता लेबनॉनने देखील उडी घेतली आहे. लेबनॉनमधील एका दहशतवादी संघटनेनं सोमवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ क्षेपणास्त्र डागून हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

पटनिबिन मॅक्सवेल असं मृत भारतीयाचं नाव असून तो केरळमधील कोल्लम शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही केरळमधील असल्याचं सांगितलं जातंय.

Rohit Pawar : “मी ‘त्या’ लोकांना सोडून जाणार नाही”, आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला

इस्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, क्षेपणास्त्र हल्ल्यात जॉर्जला गंभीर दुखापत झाली असून त्याचा चेहरा भाजला आहे. सध्या जॉर्जवर शस्त्रक्रिया केली जात असून असून त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

दुसरीकडे, मेल्विनला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उत्तर इस्रायलमधील झिव्ह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो केरळमधील इडुक्की येथील रहिवासी आहे. रिपोर्टनुसार हा क्षेपणास्त्र हल्ला इस्रायलच्या गॅलीली भागात झालाय.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, लेबनॉनने डागलेले क्षेपणास्त्र एका शेतात पडले. जिथे काम करणारे लोक त्याच्या प्रभावाखाली आले. हा हल्ला लेबनॉनमधील शिया हिजबुल्ला गटाने केला असल्याचे मानले जाते. या दहशतवादी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ ८ ऑक्टोबरपासून इस्रायलमध्ये दररोज रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply