IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विराट करणार धमाका? दोन मोठे विक्रम करण्याची संधी

Virat Kohli Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला शुक्रवारपासून (22 मार्च) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विराट कोहलाली दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.

विराट कोहलीने या सामन्यात 6 धावा करताच तो टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करेल. जर त्याने या सामन्यात 6 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा जगातील सहावा क्रिकेटपटू ठरेल, तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरेल.

त्याच्याआधी ख्रिस गेल, शोएब मलिक, कायरन पोलार्ड, ऍलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर सध्या 376 टी20 सामन्यात 11994 धावा आहेत.

MS Dhoni: धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यावर कोच फ्लेमिंग यांचे स्पष्टीकरण, ‘2022 मध्ये आम्ही तयार नव्हतो, पण आता...’

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

  • 14562 - ख्रिस गेल (463 सामने)

  • 13360 - शोएब मलिक (542 सामने)

  • 12900 - कायरन पोलार्ड (660 सामने)

  • 12319 - ऍलेक्स कॅरे (449 सामने)

  • 12065 - डेव्हिड वॉर्नर (370 सामने)

  • 11994 - विराट कोहली (376 सामने)

  • चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी

    विराटला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही मोठ्या विक्रमाची संधी आहे. जर त्याने या सामन्यात शुक्रवारी 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या, तर तो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 1000 धावा पूर्ण करेल.

    तसेच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 1000 धावा करणारा तो शिखर धवननंतरचा दुसराच खेळाडू ठरेल. सध्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा शिखर धवनच्या नावावर आहेत. त्याने 29 सामन्यांत 1057 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ विराट आहे. त्याने 31 सामन्यांत 985 धावा केल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply