Hasan Mushrif : मोठी बातमी! आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनला घेराव

Kolhapur : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. मागील महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. आता या प्रकरणातील मोठी बातमी समोर येत असून हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सरसेनापती संतांची घोरपडे साखर कारखान्याद्वारे सामान्य शेतकरी आणि सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. कागलचे विवेक कुलकर्णी यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी सभासदांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे या तक्रारीमध्ये म्हणले आहे.

कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ..

दरम्यान, या तक्रारीनंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी हसन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने जोरदार घोषणाबाजी केली तसेच हसन मुश्रीफ यांची तक्रार देखील नोंद करून घेण्याची मागणी केली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply