Gadchiroli Scam : गडचिरोलीत ६ कोटींचा धान घोटाळा; दोघांना अटक

Gadchiroli Scam : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाच्या तत्कालिन कनिष्ठ सहायकास अटक केली आहे. 
 
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाच्या तत्कालिन कनिष्ठ सहायकास अटक केली आहे. 
 

गडचिरोली येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने झालेल्या खरेदीत धान आणि बारदाण्याचा अपहार ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपये किमतीचा असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले होते. याप्रकरणी व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना ८ ऑगस्ट २०२३ रोजी निलंबित करण्यात आले होते. आता या प्रकरणात कोटवालकर यांच्यासह आणखी एका जणास अटक करण्यात आली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply