Devendra Fadnavis : अजित पवारांनी मागितलं तरी ते खातं देणार नाही! देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केलं. मेळाव्याआधी काही शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आले. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. त्याचवेळी फडणवीसांना मंत्री पदावरून त्यांना चिमटा देखील काढला. इमारतीचं काम चांगले केले आहे, पण मंत्रीपद देणार नसल्याची मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली.

बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. तुम्ही काम करा पण गृहखातं मिळणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. बारामतीत रोजगार मेळावा आयोजित केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केलं. रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिली. अधिसुचित केलेल्या सुचनेपेक्षा आलेले अर्ज कमी आहेत. अर्ज ३६ हजार आली आहेत, तर पदे ५५ हजार आहेत. यामुळे उमेदवारांना नोकरी मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

Ajit Pawar : महाराष्ट्रात १ नंबरचा तालुका करणार; तुमचा पाठिंबा हवा.. अजित पवारांची बारामतीकरांना साद

 

मेळाव्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झालं. या नमो रोजगार मेळाव्यात बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिल्याविषयीही अजित पवार यांचे कौतुक केले. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. बारातमतीमधील बस स्टॅण्ड एसी पाहून ते बस स्टॅण्ड असल्याचं वाटत नाही तर ते विमानतळ वाटतं.

 
 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांचे त्यांच्या कामाविषयी कौतुक केले. बारामतीमधील बसस्थानकात सर्व सुखसोयी उपलब्ध असणार आहे. याप्रकारचे बसस्थानके राज्यभरात केली जात आहेत. बारामतीत झालेल्या नवीन इमारती या दर्जेदार आहेत. पोलिसांच्या नवीन इमारती दर्जेदार आहेत. पोलीस कधी ही बघितलं तर उन, पाऊसमध्ये बाहेर असतात. आजच्या मंचावर पवारसाहेब पण आहेत आणि अजित पवारसुद्धा आहेत. विकासकामात आम्ही राजकारण अणू इच्छित नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply