Cyclone Biparjoy : पुढील 12 तास महत्वाचे! 'बिपरजॉय' धारण करणार रौद्ररुप; 'या' भागासाठी IMDच्या सज्जतेच्या सूचना

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू तीव्र होत असून असून पुढील १२ तासांमध्ये ते रौद्ररुप धारण करेल, त्यामुळं महाराष्ट्रासाठी हे बारा तास महत्वाचे असणार आहेत. त्यानंतर हे चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छच्या किनाऱ्यावर धडकेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ. आनंद कुमार दास यांनी बिपरजॉय चक्रीवादळाबाबत ताजी अपडेट देताना सांगितलं की, "बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मध्य अरबी समुद्र तसेच समुद्रात लगतच्या ईशान्य भागात सक्रीय असून ते लवकरत अधिक तीव्र रुप धारण करणार आहे. त्यानंतर ते उत्तरेकडं सरकेल आणि सौराष्ट्र, कच्छच्या दिशेने जाईल, १५ जूनच्या सकाळी ते सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर धडकेल.

त्यानंतर १५ जूनच्या दुपारी ते सौराष्ट्राच्या पुढे सरकत जाकाऊ बंदराला धडकेल. ज्या भागातून हे चक्रीवादळ पुढे सरकेल त्या भागावर त्याचा परिणाम होईल. या भागाला आपण आधीच ऑरेंज वॉर्निंग दिलं आहे. त्यामुळं याभागात खबरदारीची तयारी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply