Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात होणार सहभागी

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू  यांनी मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली.  मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू  यांनी उपोषणस्थळावर चर्चा केली.  आजच्या भेटीनंतर ही मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याच त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढला असून जरांगे आणि बच्चू कडू यांच्या चर्चेतून काय साध्य झालं हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.

Sharad Mohol : 'धर्माला न्याय देणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळावा. मोहोळ हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा

आज सकाळी अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेल्या बच्चू कडूचा आजचा दौरा अनपेक्षित नसला तरी सरकार दरबारी अजूनही दखलपात्र आहे हे जाणवून देणारा होता.  सकाळी सव्वा सात वाजता बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि आठ वाजल्यापासूनच मनोज जरांगे आणि बच्चू कडूमध्ये चर्चा सुरू झाली. कुणबी नोंद मिळालेल्या रक्त संबंधातील नातेवाईकांच्या सग्या सोयऱ्यांना शपथपत्र भरून पुरावा उपलब्ध करून दिल्यास त्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळावे. नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात आली.  सव्वा तासाच्या चर्चेनंतर जरांगे यांच्या मागण्या आणि त्यातील दुरुस्ती कागदावर नोंदवून बच्चू कडू यांनी सरकारकडे हे सादर करण्याच आश्वासन दिलं. त्यावर जरांगे यांनी चर्चेचे गुऱ्हाळ 7 महिन्यापासून सुरू असल्याचे उत्तर दिलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply