Asaduddin Owaisi : एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल: असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. यातच एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे की, एक दिवस असा येईल की हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल.

मुलाखतीत ओवेसींनी उत्तर प्रदेशमध्ये पीडीएम अंतर्गत निवडणूक लढविण्याबाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "यूपीमध्ये आम्ही पीडीएमचा भाग आहोत, जे मागासलेले, दलित आणि मुस्लिम आहेत. याचं नेतृत्व अपना दलाच्या पल्लवी पटेल करत आहेत. त्याचबरोबर बिहार आणि झारखंडमध्येही आम्ही लढत आहोत. झारखंडमध्ये दोन जागा लढवणार आहेत."

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडलं पैशाचं घबाड; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई

ते म्हणाले, बिहारच्या किशनगंज जागेवर निवडणूक झाली असून बिहारचे पक्षाध्यक्ष निवडणूक जिंकतील, असा आम्हाला विश्वास आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबादमध्ये 13 मे रोजी मतदान होणार असून, दोन्ही ठिकाणी विजय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. पीडीएम आणि एमआयएम उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."

मुलाखतीत ओवेसी म्हणाले की, लोक जात, बेरोजगारी, महागाई इत्यादींवर मत देत आहेत. इंडिया आघाडी मुस्लिमांना तिकीट देत नाही. जसे महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत, पण एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. त्याचप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथेही करण्यात आले आहे. अशी एकूण 10-11 राज्ये आहेत. मुस्लिमांना तिकीट न दिल्यास त्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होईल.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, सपा, आपसह सर्व विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली होती. मात्र, ओवेसींचा पक्ष यात सहभागी नाही. इंडिया आघाडीसोबत युती न करण्याच्या प्रश्नावर ओवेसी यांनी उत्तर दिले की, आमच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी एमआयएम इंडिया आघाडीचा भाग बनण्याबाबत तीनदा निवेदन दिले होते. मात्र दुसऱ्याबाजूने कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply