Amit Shah : महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर.. जळगावच्या सभेत अमित शहा कडाडले

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शहा यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला.

काय म्हणाले अमित शहा?

"येणारी लोकसभा ही आत्मनिर्भर भारत बनवण्याची निवडणूक आहे. आपल्यासमोर सगळे परिवारवादी पक्ष आहेत. हे सर्व आपल्या मुलांना पंतप्रधान बनवण्याच्या मागे लागले आहेत. काँग्रेस पार्टीने 70 वर्ष 370 कलम लटकवत ठेवले. मोदीजींनी देशाला समृद्धी बनवण्याचे काम केले," असे अमित शहा यावेळी म्हणाले.

Madhya Pradesh : मध्य प्रदेश हादरलं! ७ जणांनी बायकोची छेड काढून केली मारहाण, नवऱ्याने २ मुलांसह जीवन संपवलं

"मी मोदींची गॅरंटी सांगायला आलोय. तिसऱ्या नंबरवर भारताची अर्थव्यवस्था आणणार आहे. नरेंद्र मोदींचे पंचवीस वर्षाचे व्हिजन आहे. मुद्रा लोन दिले आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचे काम केले. काँग्रेसने मतांसाठी 70 वर्ष रामल्लाला टेन्टमध्ये ठेवले. तिसऱ्यांदा मोदीजींना 400 पार करा, असे म्हणत घराणेशाहीला पुढे करणाऱ्या पक्षांना मतदान करणार आहात का?" असा सवाल अमित शहा यांनी विचारला.

घराणेशाहीवरुन टीकास्त्र...

या सभेत बोलताना अमित शहा यांनी घराणेशाहीवरुन सोनिया गांधी उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर आहेत. ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. असे म्हणत त्यांना त्यांच्या मुलांना मुख्यमंत्री करायचं हे, तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत," असा हल्लाबोल त्यांनी केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply