Aaditya Thackeray : अजित पवारांच्या शपथविधीनंतर आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला खोचक सवाल

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत प्रवेश केला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या शिवसेनेच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ दिली गेली नाही.

हाच धागा पकडून ठाकरे गटाकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिंदे गटाला काही प्रश्न विचारले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, 'आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न.

आदित्य ठाकरेंचा पहिला प्रश्न, 'मंत्रिमंडळ विस्तार झाला, आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?' 

दुसरा प्रश्न, 'रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?'

Pune Chandani Chowk Accident : पुण्यातील चांदणी चौकातील अपघातात चार प्रवासी जखमी,

तिसरा प्रश्न, 'एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?

चौथा प्रश्न, सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना...

शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले, 'एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी' अशी ही लढाई असणार आहे!'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply