विठू नामाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे पंढरपूकडे प्रस्थान

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. दोन वर्षांपासून हा पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत होता. अखेर आज(सोमवार) याची देही याची डोळा वारकऱ्यांना हा सोहळा पाहता आला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झाले होते. मुख्य मंदिराला प्रदिक्षणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी असेल तिथं मुख्य आरती होईल मग कीर्तन असेल. उद्या सकाळी पालखी पंढरपूकडे मार्गस्थ होईल.

अवघी देहू नगरी तुकोबांच्या नामघोषाने दुमदुमून गेली असून मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडत आहे. सकाळी ७ वाजता तापोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज वारकरी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन झाले. मग, सकाळी ९ ते ११ यावेळेत इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन झाले, दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर साडेतीन च्या सुमारास जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

यावेळी मंदिर परिसर तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. पालखी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालेल मग इनामदार वाड्यात विसावेल, तिथं पहिला मुक्काम होईल. पालखीची मुख्य आरती झाल्यानंतर रात्री कीर्तन होईल. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply