भीमाशंकर : दाट जंगल, पाऊस आणि ११ तासांचा थरार; भीमाशंकर ट्रेकिंग करताना ६ तरूण बेपत्ता

भीमाशंकर: भीमाशंकर ट्रेकिंगसाठी आलेले सहा तरूण बेपत्ता झाले होते. दाट जंगल, मुसळधार पाऊस आणि धुके यामुळं रस्ता चुकलेले तरूण अखेर ११ तासांच्या थरारानंतर सुखरूप परत आले आहेत.

घोडेगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सहा जण सुखरुप परतले आहेत. सर्व जण भीमाशंकर येथे पोहोचले आहेत, अशी माहिती देण्यात आली. 

भीमाशंकर ट्रेकिंगसाठी तरुणांचा ग्रुप रायगड  जिल्ह्यातील खांडस परिसरातून सह्याद्रीच्या डोंगरातून निघाले होते. मात्र, दाट जंगल आणि मुसळधार पावसामुळं त्यांना रस्ता सापडला नाही आणि ते चुकले. ही बाब समजताच, स्थानिकांच्या मदतीने घोडेगाव पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ते रस्ता चुकले होते. त्यांना घोडेगाव पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मुसळधार पाऊस कोसळत होता. दाट धुकेही होते. डोंगराळ भाग असल्याने त्यांचा लोकेशनही ट्रेस होत नव्हता. मात्र, काही वेळाने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्यात आला. त्यांचा शोध सुरू होता.

पवन अरुण प्रतापसिंग (वय 26), सर्वेश श्रीनिवास जाधव, नीरज राजाराम जाधव, दिनेश धर्मराज यादव, अंकुश सत्यप्रकाश तिवारी, हितेश श्रीनिवास यादव (सर्व राहणार- उल्हासनगर) हे सहा जण मुरबाड येथून बैलघाटमार्गे भीमाशंकरकडे ट्रेकिंगसाठी निघाले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळं संध्याकाळीच अंधार होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रस्ता दिसेनासा झाला आणि हे सर्व ट्रेकर्स वाट चुकले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भीमाशंकर गावचे पोलीस मित्र सागर कैलास मोरमारे, सूरज तुकाराम बुरुड यांच्या मदतीने घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माने, चव्हाण, हवालदार गवारी, इष्टे, अंमलदार ढेंगळे, पोलीस कॉन्स्टेबल गवारी, होमगार्ड कानडे यांनी शोधकार्य सुरू केले. अखेर ११ तासांनंतर या सर्वांना सुखरूप परत आणण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आले. हे सर्व जण भीमाशंकर येथे पोहोचले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply