पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वेग नियंत्रणासाठी आधुनिक प्रणाली; वर्षभरात कार्यन्वित करण्याचा प्रयत्न

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्सप्रेस वे) अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यासाठी आणि वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी आधुनिक वाहतूक प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन – एमएसआरडीसी) सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) ही अधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुरुवात केली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. यामुळे रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जवळपास ९४ किलोमीटर अंतर असणाऱ्या या मार्गावरील घाटरस्ते, बोगदे यांचा अचूक अंदाज येत नसल्याने भरधाव जाणाऱ्या वाहनांचा अपघात होत असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. तसेच घाटरस्त्यामध्ये वर्षांविहारासाठी आलेले पर्यटक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करीत असल्याने वाहतूक कोंडी होत असून मो

१६० कोटी रुपये खर्च अपेक्षित..

पुणे मुंबई द्रुतगती मार्गादरम्यान ‘आयटीएमएस’ यंत्रणेसाठी १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मार्गावर वाहतूक शिस्त पाळली जावी, अपघात टळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच पथकर वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, ३९ ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’, तर ३४ ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणारी ‘लेन डिसिप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे, असेही महामंडळाचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी सांगितले.

महामार्गाचे काम सुरू असतानाच येथील सुरक्षिततेच्या दृष्टीने एमएसआरडीसीने २०१९ मध्ये आयटीएमएस ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे पुढील कार्यवाही करता आली नाही. सद्य:स्थितीत निविदा प्रक्रियेनुसार मेसर्स प्रोटेक्ट सोल्यूशन लिमिटेड या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीशी महामंडळाने करार केला असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नऊ महिन्यात हे काम पूर्ण करून पुढील एक ते दोन महिने चाचणी घेण्यात येणार असून वर्षभरात ही आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित होईल.’

– राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते महामंडळाचे 

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply