पुणे : बीजोत्पादनातून सहा क्विंटल कांदा बियाण्यांची निर्मिती

माळशिरस : नायगाव (ता. पुरंदर) येथील प्रगतिशील शेतकरी संदीप खेसे व गणेश खेसे या खेसे बंधूंनी आपल्या अडीच एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामधून सत्तर टक्के क्षेत्रात सहा क्विंटल कांदा बियाणे तयार झाले आहे. त्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा होत आहे.

खेसे बंधूंनी लागवडीची पूर्वतयारी करताना प्रथमत: शेत नांगरून दोन पाळ्या घालून जमीन भुसभुशीत केली व त्यातील अगोदरच्या पिकातील धसकटे वेचून शेत स्वच्छ व सपाट केले व चार फुटांवर ड्रिपचे लॅटरल अंथरूण घेतले व नंतर अडीच एकर क्षेत्रामध्ये लागवड केली.

खत व्यवस्थापन करताना लागवडीअगोदर एकरी १०० किलो १०:२६:२६, बेनसल्फ १० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो, २० किलो रुट्स दाणेदार टाकले. गोट कांदे वीस दिवसांचे झाल्यानंतर पहिला खताचा डोस १०० किलो २४: २४:० व दहा किलो मायकोरायझा टाकले. दुसरा डोस लागवडीपासून ५० दिवसांनी १०० किलो १८:४६ व ५० किलो पोटॅश (mop)टाकले. अधून मधून पाणी देताना १९:१९:१९, १२:६१, १३:४०:१३ व शेवटी ०:५२:३४ सोडले तसेच मुळकुज साठी ट्रायकोडर्मा, हुमिक व पी एस बी केएसबी पाण्यातून जमिनीत सोडले.

अशी केली लागवड १. लॅटरल अंथरण्याच्या अगोदर एक फुटाचे अंतरावर ठेवले २. छोट्या ट्रॅक्‍टरच्या मदतीने दोन काकऱ्या मारल्या व दीड फूट अंतर ठेवले ३. यामध्ये कांद्याचा एक तृतीयांश भाग चिरून कांद्याची लागवड केली. ४. त्यामुळे ढेगळ्यांची संख्या जास्त आली.

कांदा बियाण्याची निवड लागवडीसाठी पूना फुरसुंगी कांद्याची टिकवणक्षमता व कलर चांगला असतो व तो साठवणीसाठी व विक्रीसाठी चांगला चालतो. यामुळे पूना फुरसुंगी या जातीच्या कांद्याची खरेदी केली व त्यासाठी कीर्ती बिजांकूर सीड्सचे अमोल शितोळे साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले. कांदा हा एकसारख्या आकाराचा मध्यम गोल व फाकटी विरहित घेतला.

बोंडामध्ये चांगली बियाणे भरण्यासाठी मधमाशांची खूप आवश्यकता असते. मधमाशांची संख्या कमी दिसल्यामुळे कृषी विभागातून श्री. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मधमाशांच्या तीन पेट्या आणल्या तसेच शेतामध्ये पिवळी रंगाची झेंडू, सूर्यफूल, मोहरी इ . फुलांची लागवड केली. त्यामुळे मधमाश्या आकर्षित होऊन बोंडामध्ये चांगले बियाणे भरले.

गेल्या हंगामामध्ये प्रयोग म्हणून थोड्या शेतकऱ्यांना कांदा बियाणे दिले. ज्या शेतकऱ्यांनी त्याचा कांदा शेतात लावला त्या कांद्याचा कलर, एकसारखेपणा, उगवणशक्ती व आकारमान चांगला आला. त्यामुळे कमी दरामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे या उद्देशाने फक्त १५००/- रुपये किलो या माफक दराने विक्री करणार आहे. राहिलेले बियाणे याच दराने कीर्ती बीजांकूर सीड्स पुणे या कंपनीने घेण्याची हमी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply