पुणे : बांधकाम व्यावसायिकावर ‘मोफा’ कायद्यान्वये गुन्हा; सदनिकेचा वेळेत ताबा न देता ग्राहकाची फसवणूक

पुणे : सदनिकेचा वेळेत ताबा न दिल्या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात ‘मोफा’ (महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक ऋषभ पारसमल जैन; तसेच बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर विलास कोठारी (वय ३२, रा. संत नामदेव शाळेजवळ, महर्षीनगर) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोठारी यांनी जैन यांच्या कोंढव्यातील पिसोळी भागात असलेल्या गृहप्रकल्पात सदनिका खरेदीचा व्यवहार केला होता. कोठारी यांनी जैन यांच्या कंपनीच्या खात्यात १९ लाख रुपये जमा केले होते.

जैन यांनी तात्पुरते देकार पत्र देऊन काेठारी यांना ३६ महिन्यांत सदनिकेचा ताबा देतो, असे सांगितले होते. कोठारी यांच्याकडून पूर्ण पैसे स्वीकारुन जैन यांनी ३६ महिन्यांच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदनिकेचा ताबा दिला नाही. जैन यांच्या विरोधात फसवणूक, अपहार; तसेच ‘मोफा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply